सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभर वाट पहावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:33 AM2021-02-20T05:33:03+5:302021-02-20T05:33:03+5:30

जुलै-ऑगस्ट महिन्यांपासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. प्रभावी औषध नसल्याने ५७५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष ...

Everyone will have to wait a year to get the corona vaccine | सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभर वाट पहावी लागणार

सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभर वाट पहावी लागणार

googlenewsNext

जुलै-ऑगस्ट महिन्यांपासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. प्रभावी औषध नसल्याने ५७५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष लस कधी मिळेल याकडे लागले होते. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झालेली आहे. मागील महिनाभरात सुमारे १४ हजार जणांनी नोंदणी केली. यातील जवळपास ८ हजार लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाची गती पाहता सर्वांना लस घेण्यासाठी वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

४०० जणांना जिल्ह्यात रोज लस दिली जात आहे.

८००० जणांनी आतापर्यंत लस घेतली

चौकट...

डोस उपलब्ध, मग गती का नाही?

लसीकरणासाठी १४ हजार जणांनी नोंदणी केली आहे. १९ हजार डोसेस उपलब्ध झाले होते. मात्र, अद्याप ८ हजार व्यक्तींनीच लस घेतली आहे. तर अद्यापही ६ हजार जणांनी लस घेतलेली नाही. लस न घेण्याचे कारण लसीकरणाबाबत अकारण भपतीचे वैद्यकीय अधिकऱ्यांनी सांगितले.

दहा दिवसांत ११२ रुग्णांची भर

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून रुग्णवाढीचा वेग कमी झाला होता. १५ फेब्रुवारीपर्यंत ही रुग्णसंख्या कमीच होती. मात्र, मागील दोन- तीन दिवसांपासून रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. ९ ते १८ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या कालावधीत ११२ रुग्णांची भर पडली आहे.

कोट...

आठ केंद्रावर लसीकरण सुरु आहे. प्रत्येक केंद्रास प्रतिदिन शंभर लसीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १४ जणांनी कोविन ॲपवर नोंदणी केली असून ६० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मार्च महिन्यापासून ५० वयोगटापुढील व्यक्तीस लस दिली जाणार आहे.

डॉ. धनंजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक

रोज कुठल्या केंद्रावर किती लस

उस्मानाबाद ४७

कळंब ६०

लोहारा ५२

उमरगा ७२

तुळजापूर ५६

परंडा ६५

भूम ७४

वाशी ७०

Web Title: Everyone will have to wait a year to get the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.