बियाण्यांवरून शेतकरी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:54+5:302021-06-16T04:43:54+5:30
उमरगा : शेतकऱ्यांची लूट थांबवून चार दिवसांत योग्य दरात व तत्काळ बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यात ...
उमरगा : शेतकऱ्यांची लूट थांबवून चार दिवसांत योग्य दरात व तत्काळ बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावे, अन्यथा उमरगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सदरील निवेदन प्रशासनाला दिले आहे.
अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे बी-बियाणे तसेच खताच्या कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना चढ्या भावाने बी-बियाणे व खते खरेदी करावी लागत आहेत. संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवून शेतकऱ्यांची गैरसोय करणाऱ्या संबंधित कृषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी. या अनुषंगाने चार दिवसांत पाऊले उचलावीत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयासमाेर बाेंबाबाेंब आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी संघटनेचे रामेश्वर सूर्यवंशी, वजीर शेख, करीम शेख, झाकीर मुजावर, राहुल सूर्यवंशी, जयवंत कुलकर्णी, महेबूब पठाण, श्रावण वाकले आदींची उपस्थिती हाेती.