एक न एक आजारी व्यक्ती शोधून काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:48+5:302021-05-09T04:33:48+5:30

उस्मानाबाद : कोरोनाचा पूर्णतः संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून गावातील एक न एक आजारी व्यक्ती शोधून काढणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ...

Find a sick person one by one | एक न एक आजारी व्यक्ती शोधून काढा

एक न एक आजारी व्यक्ती शोधून काढा

googlenewsNext

उस्मानाबाद : कोरोनाचा पूर्णतः संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून गावातील एक न एक आजारी व्यक्ती शोधून काढणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गावोगावी काम करत असलेल्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शिक्षक, सरपंच यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केले.

उस्मानाबाद तलुक्यातील काही गावांना डाॅ. फड यांनी भेटी देऊन काेराेना संसर्ग राेखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययाेजनेचा आढावा घेतला. यावेळी ते बाेलत हाेते. डाॅ. फड म्हणाले की, गावातील काही लोकांमध्ये आजही चुकीचा समज आहे की, आपण आपला आजार असाच अंगावर काढला तरी तो आपोआप बरा होईल किंवा आपोआप निघून जाईल. स्थानिक डॉक्टरांकडून गोळ्या औषध घेतल्यामुळे कोणाला आजाराबद्दल सांगण्याची गरज नाही, असेही काही लोक समजत आहेत. जिल्हा परिषदअंतर्गत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना खरी माहिती देत नाहीत. त्यामुळे परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यानंतर दवाखाना गाठण्याशिवाय पर्याय राहत नाही, असे रुग्ण निदर्शनास येत आहेत. याचा विपरीत परिणाम कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यावर होत आहे. हे रोखण्यासाठी तपासणी पथकाने गावातील इतर नागरिकांच्या मदतीने रुग्णांचा शोध घेण्याचे काम कसोशीने केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने, डॉ. किरण गरड, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

Web Title: Find a sick person one by one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.