वाशी (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणाविरूध्द सोमवारी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत सुरेश गोवर्धन कवडे यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ त्यांची मुलगी सोनाली हिस पतीसह सासरच्या मंडळींनी घर बांधकामासाठी माहेरहून एक लाख रूपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक, मानसिक जाच करीत उपाशी ठेवले़ या त्रासाला कंटाळून विवाहिता सोनाली सुकाळे यांनी पिंपळगाव लिंग शिवारातील शेतात १६ जानेवारी रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ या तक्रारीवरून पती दिगंबर सर्जेराव सुकाळे याच्यासह बाळासाहेब सर्जेराव सुकाळे, इतर दोन महिला (सर्व रा़ पिंपळगाव लिंगी), डॉ़ पोकळे व ननंद (दोघे रा़ चौसाळा ताक़ेज) या सहा जणाविरूध्द सोमवारी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़