शासकीय रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:39+5:302021-04-14T04:29:39+5:30

शासकीय, खाजगी रुग्णालये तसेच मोठ्या आस्थापना, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, सार्वजनिक ठिकाणे आदींचे फायर ऑडिट व विद्युत सुरक्षा तपासणी करण्याचे ...

Fire audit of government hospitals soon | शासकीय रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट

शासकीय रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट

googlenewsNext

शासकीय, खाजगी रुग्णालये तसेच मोठ्या आस्थापना, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, सार्वजनिक ठिकाणे आदींचे फायर ऑडिट व विद्युत सुरक्षा तपासणी करण्याचे तसेच करुन घेण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत. या समितीत सात सदस्य व एका सदस्य सचिवांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर, जि.प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणुमंत वडगावे, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांचा समितीत समावेश आहे. सोबतच अन्न सुरक्षा परीक्षण तसेच विद्युत सुरक्षा परीक्षण तपासणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीत जिल्हा अग्निशमन अधिकारी, विद्युत निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युतचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. या समित्या जिल्ह्यातील नगर परिषदा तसेच विशेष नियोजन प्राधिकरण कार्यक्षेत्रातील शासकीय, निमशासकीय रुग्णालयातील अग्नी सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण तसेच विद्युत सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करतील. तर खाजगी रुग्णालयांनी नोंदणीकृत संस्थेकडूनच या तपासण्या करुन घ्यावयाच्या आहेत. तसेच वर्षातून एकदा मॉकड्रिल घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी महाविद्यालये, शाळा आदिवासी विकास विभाग तसेच समाजकल्याण विभागाचे विद्यार्थी वसतिगृह, मंगल कार्यालय, हॉल यांचेही परीक्षण करुन आढळलेल्या त्रुटींचे निराकरण करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: Fire audit of government hospitals soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.