शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

गुंजोटीकरांना ‘पीएचसी’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:29 AM

गुंजोटी : सोळा ते सतरा हजार लोकसंख्या असलेल्या गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी मिळून सात वर्षांहून जास्त काळ ...

गुंजोटी : सोळा ते सतरा हजार लोकसंख्या असलेल्या गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी मिळून सात वर्षांहून जास्त काळ उलटला असून, यासाठी एकाने दोन एकर जागादेखील ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली; परंतु, प्रत्यक्षात काम मात्र अद्यापही सुरू झालेले नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. यासाठी गुंजोटीसह औराद, कदेर, कसगी, मुरळी, भुसणी, गुंजोटीवाडी, कसगीवाडी, नगराळ या गावांचे ठराव घेऊन गुंजोटी ग्रामपंचायतीने शासनाकडे जवळपास १० वर्षांपूर्वी ते सादर केले होते. यानंतर २००८ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर यांनी गुंजोटीच्या आरोग्य केंद्राबाबत हिरवा कंदील दाखविला होता. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावपुढाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही उमरगा येथील बंद पडलेले नागरी रुग्णालय गुंजोटीला सुरू करून ‘दुधाची तहान ताकावर’ भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायतीच्या विनंतीवरून गावातील एका नागरिकाने गावाशेजारील आपली दोन एकर जागाही ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर पाठपुरावा करून गुंजोटीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला सन २०१३ मध्ये शासनाकडून मंजुरी मिळाली होती. परंतु, मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मात्र अद्यापही सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे, मागील वर्षी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना माजी सरपंच सुशीलाबाई देशमुख यांच्या विनंतीवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना शिफारसही केली होती. तसे प्रस्तावही पुन्हा ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई येथे जाऊन दिले होते. मात्र, अजूनही आरोग्य केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही.

उपचारासाठी होतोय २५ कि.मी.चा प्रवास

सध्या गुंजोटी व परिसरातील गावे मुळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली गेली आहेत. त्यामुळे कसगी, कदेर, मुरळी व वाडी तांड्यावरील नागरिकांना उपचारासाठी २५ ते ३० कि.मी. अंतर कापून मूळजला जावे लागते. गुंजोटीला आरोग्य केंद्र उभारल्यास या जवळच्या गावांना ते सोयीचे ठरणार आहे.

कोट....

प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध होऊनही बराच काळ उलटला. परंतु, लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. गावच्या व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी येथील आरोग्य केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.

- रवींद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य

निजाम राजवटीपासून उमरगा तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव म्हणून मराठवाड्यात गुंजोटीची ओळख आहे. सामाजिक जाणिवेतून एका दानशूर व्यक्तीने आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध करून दिली. मात्र, निधीअभावी अजून कामाला सुरुवात झाली नाही.

- राजेंद्र गायकवाड, माजी उपसरपंच

निधी मिळविण्यासाठी गावकरी व गावपुढारी यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलन उभारण्याची गरज आहे; तरच गुंजोटीकरांची प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्णत्वास जाईल, असे वाटते.

- पिंटू साखरे, भाजप शाखाध्यक्ष

गुंजोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम निधीसाठी राजकारण आड येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून, येथील ग्रामपंचायतदेखील सेनेकडे आहे. त्यामुळे आता निधी मिळण्यास काहीच अडचण नाही.

- सुशीलाबाई देशमुख, माजी सरपंच

गुंजोटीसह आसपासच्या गावाची लोकसंख्या तीस हजारांहून जास्त आहे. त्या नागरिकांच्या सोयीसाठी गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे व सोयीचे ठरणार आहे.

- सुरेश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य

सध्या गुंजोटी येथे नागरी दवाखाना कार्यान्वित आहे. मात्र, वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. त्यासाठी गुंजोटी येथील पुढाऱ्यांनी एकत्र येऊन निधीसाठी प्रयत्न करून गुंजोटी व परिसरातील जनतेची सोय करावी.

- सुनील पाटील, ग्रामस्थ

राज्यात सध्या आमची सत्ता आहे. त्यामुळे गुंजोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी जास्तीत जास्त मिळविण्यासाठी आ. ज्ञानराज चौगुले यांना भेटून पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेत जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेऊन पुढील पाठपुरावा करीत आहोत. माजी सरपंचांनी या निधीसाठी पाठपुरावा केला होता. परंतु, आणखी पाठपुराव्याची गरज आहे.

- सरस्वतीताई कोरे, सरपंच