रेल्वेची संख्या वाढल्याने व्यापारी, प्रवाशांची सोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:21+5:302021-08-12T04:36:21+5:30
उस्मानाबाद : कोरोना संसर्गामुळे शासनाने बससह रेल्वेसेवादेखील काही महिने बंद ठेवली होती; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व ...
उस्मानाबाद : कोरोना संसर्गामुळे शासनाने बससह रेल्वेसेवादेखील काही महिने बंद ठेवली होती; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असून, बस, रेल्वेसेवाही आता सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद रेल्वेस्थानकावरून सात गाड्या धावत आहेत. यातही मुंबई गाडीला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन बुकिंगची सुविधा असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली असून, मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेसेवा बंद होती. आता बहुतांश रेल्वे पूर्ववत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑनलाइन तिकीट; प्रवाशांचा प्रतिसाद
रेल्वे प्रशासनाच्या वतीने ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण या सुविधेचा लाभ घेत आहेत. मुंबईला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने ऑनलाइन बुकिंगनेच तिकीट घेण्यावर भर आहे. दरम्यान, स्थानकावरही कोरोनाच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. सध्या ऑनलाइन तिकिटाला प्रवाशांची पसंती असल्याचे सांगण्यात आले.
सुरू असलेल्या रेल्वेगाड्या
लातूर-मुंबई
बीदर-मुंबई
हैदराबाद-हडपसर
कोल्हापूर-नागपूर
पनवेल-नांदेड
कोल्हापूर-धनबाद
सर्वाधिक गर्दी मुंबईला
जाणाऱ्या प्रवाशांची
मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे. त्यामुळे रात्री साडेअकरा वाजता स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते.
प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे पालन करीत प्रवासी प्रवास करीत आहेत.
रेल्वे प्रवासात जात असताना योग्य ती काळजी घेत आहे. मागील काही दिवस रेल्वे बंद असल्याने खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने गैरसोय दूर झाली आहे.
-जाहिरोद्दीन सय्यद, व्यापारी
मुंबईला नेहमीच ये-जा असते. कोरोनामुळे काही दिवस रेल्वे बंद होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दरम्यान, अद्याप कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
-आनंद देशमुख, उस्मानाबाद