यावेळी रामचंद्र आलुरे म्हणाले, कामगारांनी दैनंदिन कामातून मिळविलेली रक्कम व्यसनामध्ये घालवू नये. त्याचा विनियोग आपले कुटुंब, चांगल्या कामासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी करावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषण डॉ. उमाकांत चन्नशेट्टी यांनी केले. यावेळी कामगारांनी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करून शपथ घेतली.
याप्रसंगी दादाराव गायकवाड, शंकर धोत्रे, रमेश धोत्रे, सोमनाथ धोत्रे, दशरथ गायकवाड, महादेव बोराडे, नागनाथ गायकवाड, नितीन कांबळे, गणेश चव्हाण, राहुल देडे, शशिकला लक्ष्मी बनसोडे, धोत्रे, फुलाबाई कुंभार, भारताबाई नरवडे, लक्ष्मी गायकवाड, राजू मोरे, अमोल इटकर या कामगारांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. डॉ. एम. बी. बिराजदार यांनी केले.
(कॅप्शन)
कामगार दिनानिमित्त अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. उमाकांत चन्नशेट्टी, सरपंच रामचंद्र आलुरे, मजूर संघटनेचे नवनाथ धोत्रे आदी.