शेती कामासाठी मजुरांची मोठी वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:27 AM2021-01-09T04:27:06+5:302021-01-09T04:27:06+5:30

काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ''''''''स्थित्यंतरे'''''''' झाली आहेत. यात बहुतांश मजूर वर्गांना शेती व्यतिरिक्त ''''''''रोजगार'''''''' उत्पन्न झाला आहे. यातून ...

Large variety of laborers for agricultural work | शेती कामासाठी मजुरांची मोठी वाणवा

शेती कामासाठी मजुरांची मोठी वाणवा

googlenewsNext

काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ''''''''स्थित्यंतरे'''''''' झाली आहेत. यात बहुतांश मजूर वर्गांना शेती व्यतिरिक्त ''''''''रोजगार'''''''' उत्पन्न झाला आहे. यातून काही गावात ''''''''स्थलांतरे'''''''' ही नोंदली गेली आहेत. यामुळे निव्वळ शेती मशागतीवर उदरनिर्वाह भागवणार्या कुंटूबातील संख्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प राहिली आहे. यास्थितीत शेती क्षेत्र कात टाकत असताना पिकपद्धती बदलत असली तरी संकटाची मालिका काही संपुष्टात आलेली नाही. लहरी निसर्ग, वाढता उत्पादन खर्च, दरातील अस्थिरता यासोबतच शेती कसण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने गावोगावी कोणी सालगडी देता? का सलागडी, मजूर देता? का देता? अशी आर्त विनवणी करण्याची नौबत शेतकर्यांवर आली आहे.

चौकट...

पाच वर्षापूर्वी मजुरी दर

स्त्री १२५

पुरूष २००

सध्या

स्त्री २५०

पुरूष ३५०

यंत्राणे होणारी कामे

नांगरणी, मोगडनी, पाळी, पेरणी, काढणी,फवारणी अशी कामे यंत्राणे करण्यावर सध्या भर दिला जात आहे. असे असले तरी मशागत, काढणी, छाटणी, मळणी आधी विविध पिकांच्या कामाला मजुरांची गरज असते.

गरज ही शोधाची जननी

मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकर्यांना गरज असलेल्या व मजुराकरवी करून घेत जात असलेल्या कामासाठी नवतंत्राने अनेक यंत्र, सामग्री उपलब्ध करून दिली आहे. ट्रक्टर्सचा व त्यावरील यांत्रीक साधनाचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. यामुळेच बैलपेर आत्ता नामशेष होत असल्याचे दिसत आहे तर कापूस वेचनीसाठी यंत्राचा शोध लागत नसल्याने व मजूरही मिळत नसल्याने शेतकरी हे पिक घेण्याचे टाळत आहेत.

"शेती कामासाठी मजूर मिळतच नाहीत. यामुळे अडचणी येत आहेत. कापसाला वेचनीसाठी माणूस मिळत नाही, यात दरही वाढवला आहे. यामुळे यापुढे पिकच घ्यायचे टाळणार आहोत. -राजाभाऊ गंभिरे

मजुराअभावी फवारणी,भाजीपाला काढणी,खुरपणी,खते देने,इ कामे वेळेवर न झाल्याने उत्पादनात घट होते आणि सध्या मजूर गुत्ते पद्धतीमध्ये अव्वाच्या सव्वा मागत आहे पण शेतकऱ्याला पर्याय नाही उदा ऊस लावणं 6000 रु एकर सोयाबीन काढणी 4000रु बॅग घेत आहेत. -विनोद तांबारे,आंदोरा

शेतीच्या दैनंदिन कामासाठी मजूर मिळत नाहीत. याशिवाय नियमित कामासाठी सालगडी ही मिळत नाहीत. यासाठी दुसर्या जिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. सोयाबीन काढणीला बाहेरच्या जिल्हातील मजूर आणले होते. -तानाजी वाघमारे

, भाटशिरपुरा

Web Title: Large variety of laborers for agricultural work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.