‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:38 AM2021-02-17T04:38:33+5:302021-02-17T04:38:33+5:30
कळंब : उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरु असलेल्या ‘स्वच्छ व सुंदर ...
कळंब : उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरु असलेल्या ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अंतर्गत ‘ स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा शुभारंभ भाटशिरपुरा शाळेत करण्यात आला.
नूतन सरपंच सुनीता दिलिप वाघमारे यांच्या हस्ते व माजी सरपंच अच्युत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, उपसरपंच सूर्यकांत खापे, माजी अध्यक्ष रमेश रितपुरे, माजी चेअरमन दिलीप वाघमारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ रितपुरे, उपाध्यक्ष ईश्वर मस्के, ग्रामपंचायत सदस्य संजय चंद्रसेन गायकवाड, सिंधू सुरेश रितपुरे, शकुंतला बापुराव कदम, मिरा बालाजी डीगे, रोहिणी विनायक शिंदे, जिजाबाई बाबूराव पवार, सुंदरबाई भगवान झोंबाडे, राजकन्या अशोक सिरसट हे नूतन ग्रामपंचायत सदस्य व सिद्धेश्वर कदम उपस्थित होते. या अभियानात शाळेचा सर्व परिसर स्वच्छ व सुशोभित करणे, शाळेची रंगरंगोटी करुन परिसरात वृक्षारोपण करुन हरितशाळा बनवणे तसेच शाळेतील सर्व रेकॉर्ड अद्ययावत करण्यात येणार आहे. यावेळी शाळेच्या वतीने नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी शिक्षक सचिन तामाने, शहाजी बनसोडे, दिलीप पवार, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात यांनी परिश्रम घेतले. प्रास्तविक मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे, सूत्रसंचलन संजय झिरमिरे यांनी केले. प्रदीप रोटे यांनी आभार मानले.