पालिका अपहारातील मास्टर माइंड साेलापुरातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:30 AM2021-03-24T04:30:32+5:302021-03-24T04:30:32+5:30

उमरगा - येथील पालिकेत पावणेदोन कोटी रूपयांच्या अपहार प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या फरार पवन मात्रे यास उस्मानाबाद आर्थिक गुन्हे ...

Mastermind arrested in Palaka embezzlement from Salelapur | पालिका अपहारातील मास्टर माइंड साेलापुरातून जेरबंद

पालिका अपहारातील मास्टर माइंड साेलापुरातून जेरबंद

googlenewsNext

उमरगा - येथील पालिकेत पावणेदोन कोटी रूपयांच्या अपहार प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या फरार पवन मात्रे यास उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सोलापूर येथून अटक केली. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडील इनोव्हा कारही जप्त केली आहे.

उमरगा पालिकेत पहिल्यांदा ४९ लाखाच्या अपहारप्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अपहाराची रक्कम पावणेदोन कोटी झाली. पालिकेचे तत्कालिन लेखापाल विनायक वडमारे, दोन कंत्राटी कर्मचारी धम्मपाल ढवळे, सूरज चव्हाण यांच्यासह सचिन काळे, पवन बाबुराव मात्रे - सोमवंशी व नंतरच्या तपासात नंदकुमार झांबरे अशा सहा जणांची नावे अपहार प्रकरणात समोर आली होती. या प्रकरणात पहिल्यांदा कंत्राटी कर्मचारी ढवळे याला २२ ऑक्टोबरला अटक झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अपहारीत दहा लाख रुपये भरल्यानंतर जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ महिन्याने म्हणजेच २ जूनला सचिन काळे, सुरज चव्हाण यांना अटक केली. त्यानंतर चव्हाण यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, न्यायालयाने अपहारित रक्कमेतील दहा लाख २८ हजार रुपये भरण्याच्या अटीवर जामिन मंजूर केला. ती रक्कम त्यांनी पालिकेत भरली. काळे यांना २६ लाख भरण्याची अट होती. झांबरे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तेरा लाख ७० हजार रूपये भरल्यानंतर त्यांच्या जामिनाची प्रक्रिया झाली. दरम्यान अपहार झालेल्या पावणेदोन कोटींपैकी ३३ लाख ९८ हजार पालिकेत जमा झाले आहेत. आता पर्यत या प्रकरणातील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दीड वर्षानंतर मात्रे जाळ्यात..

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ, कर्मचारी शरद घुगे, एस.डी. साबळे, बी पी. बलसूरे आदींच्या पथकाने श्रीकांतनगर, जुळे सोलापूर येथे भाड्याने खोली करून रहात असलेल्या घरातून पवन म्हात्रे याला अटक केली. म्हात्रे याच्या नावावर ३९ लाखाचा अपहार असून या रक्कमेतून त्याने इनव्हा कार खरेदी केली होती. तो तब्बल दीड वर्षांपासून फरार होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक शेजाळ यांनी दिली.

Web Title: Mastermind arrested in Palaka embezzlement from Salelapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.