वेडसर व्यक्तीला दिला मायेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:49+5:302021-03-26T04:32:49+5:30
ना घर, ना निवारा... उन्ह, वारा, पाऊस, थंडीत हा इसम मागील वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनपासून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी ते ...
ना घर, ना निवारा... उन्ह, वारा, पाऊस, थंडीत हा इसम मागील वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनपासून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी ते सांगवी शिवारात रस्त्यालगत राहत होता. दाढी, डोक्याचे केस अमाप वाढले होते. अंगावर मळकट फाटलेले कपडे घालून तो दिवस-दिवस एकाच ठिकाणी बसून राहत होता. कोणी खायला दिले तर घ्यायचा नसता अन्नाशिवाय केवळ तलावातील पाणी पिऊन त्याने दिवस काढले. त्याची भाषा कुणालाच समजत नव्हती. अनेक वेळा तुळजाभवानी दर्शनासाठी जाणारे भाविक थांबून त्याला खायला भाकरी देत. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना नमस्कार घालणे, हा त्याचा नित्यक्रम.
दोन महिन्यांपूर्वी हा व्यक्ती तामलवाडी शिवारात रस्त्यालगत वास्तव्यास आला. तामलवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब रणसुरे, उद्योजक आलीम पठाण, सरस्वती विद्यालयाचा शिपाई चौडाप्पा मसुते यांनी या वेडसर इसमाचे केस न्हाव्याच्या मदतीने कापून त्यास अंघोळ घातली. तसेच पोटभर जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.