भाजपाचे साखळी धरणे आंदाेलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:38 AM2021-02-17T04:38:41+5:302021-02-17T04:38:41+5:30
जिल्ह्यात अतिवृष्टी झाली हाेती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाहून गेली. प्रकल्प फुटल्याने तसेच नद्यांचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून ...
जिल्ह्यात अतिवृष्टी झाली हाेती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाहून गेली. प्रकल्प फुटल्याने तसेच नद्यांचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. अशा शेतकर्यांना पीक विमा मिळणे गरजेचे हाेते. परंतु, विमा कंपनीने जाचक अटी लादून शेतकर्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. अशा शेतकर्याना विमा मिळवून देण्यास कंपन्यांना सरकारने भाग पाडावे अथवा स्वात सरकारने जबाबदारी उचलावी, यासाठी भाजपाकडून पाठपुरावा करण्यात आला. परंतु, कुठलाच निर्ण झाला नाही. त्यामुळे भाजपाच्या वतीने जिल्हा कचेरीसमाेर साेमवारपासून साखळी धरणे आंदाेलन करण्यात आले आहे.मंगळवारी आंदाेलनाचा दुसरा दिवस हाेता. जाेपर्यंत शेतकर्यांना न्याय मिळत नाही, ताेवर आंदाेलन सुरूच राहील, असा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे.
चाैकट...
पीक विमा आमच्या हक्काचा...
साखळी पद्धतीने हे धरणे आंदाेलन करण्यात येतआहे. या आंदाेलनात सहभागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जाेरदार घाेषणाबाजी केली जात आहे. पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा’ अशा स्वरूपाच्या घाेषणांनी आंदाेलनस्थळ दणाणून गेले हाेते.