लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा नगरपंचायत पंचवार्षीक निवडणूकीत बुधवारी झालेल्या मतमोजणीत. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने सेनेचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली १७ जागा पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत नगरपंचायतवर सत्ता काबीज केली आहे. कॉग्रेसला केवळ ४ जागावर यश मिळाले आहे. तर २ जागावर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात दोन माजी नगरध्यक्ष व तीन माजी नगरसेवकांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
लोहारा नगरपंचायतची पंचवार्षीक निवडणूक झाली. यात १७ जांगापैकी १३ जागेसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान झाले. १३ जागेसाठी ४४ उमेदवार रींगणात होते. त्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या वादामुळे ४ जागांची निवडणूक प्रक्रिया थांबली होती. त्या ४ जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. या ४ जागेसाठी १४ उमेदवार रींगणात होते. या निवडणूकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी विरुध्द काँग्रेस अशी दुरंगी लढत झाली. त्यात अपक्ष उमेदवारांनी प्रचारात वेग घेतल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यामुळे विजयी कोणाचा होणार हे मात्र स्पष्ट सांगणे कठीण झाले होते. पण या राजकीय पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यातून सत्ता आमचीच येणार असा दावा केला होता.
शिवसेना , राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीच्या प्रचारात मंत्री नवाब मलिक,खा.ओमराजे निंबाळकर,माजी खा.रविद्र गायकवाड, आ.ज्ञानराज चौगुले, आ. कैलास पाटील,आ.अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार हे उतरले होते. तर कॉग्रेसच्या प्रचारात कॉग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील, कॉग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव हे उतरले होते. अपक्षानी स्वत:च खिंड लढवली. बुधवारी मतमोजणी झाली आणि चित्र स्पष्ट झाले. यामध्ये आ.ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ९ तर राष्ट्रवादी कॉग्रेसने २ जागेवर विजयी मिळवत १७ जागापैकी ११ जागा काबीज करत सत्ता ताब्यात घेतली आहे. कॉग्रेस ४ जागेवर व अपक्ष २ जागेवर विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत पेढे वाटत अनंद साजरा केला.
यांचा झाला पराभवया निवडणूकीत शिवसेनेच्या माजी नगरध्यक्षा पोर्णिमा लांगडे या प्रभाग पाचमधून तर कॉग्रेसच्या माजी नगरध्यक्षा ज्योती मुळे या प्रभाग क्रमाक ८ मधून या पराभूत झाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आबुलवफा कादरी हे प्रभाग क्रमाक ४ मधून,कॉग्रेसच्या माजी नगरसेविका निर्मला स्वामी या प्रभाग क्रमाक १७ मधून,माजी नगरसेवक पठाण इंताज अतिउल्लाखा,शिवसेनेचे अविनाश माळी प्रभाग १० मधून,कॉग्रेसचे हरी लोखंडे प्रभाग ३ मधून यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.