दक्षिण जेवळी गावाचे पुनर्वसन झाल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या शंभू महादेव मंदिरात गेल्या पंचवीस वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी दोन दिवसीय यात्रा महोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे यात्रा होऊ शकले नाही, तर यावर्षीही दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या संकटामुळे पारंपरिक यात्रा रद्द करण्यात आली. यासंदर्भात शनिवारी सरपंच चंद्रकांत साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दौलप्पा तोरकडे, शिवकांत होनाजे, भीमाशंकर साखरे, बसवराज स्वामी, वीरभद्र स्वामी, नागनाथ गुंजोटे, सोमनाथ गुंजोटे, उमाकांत उपासे, नागेश होनाजे, अविनाश भुसाप्पा, दयानंद होनाजे, ओमकार भुसाप्पा उपस्थित होते.
सय्यद हिप्परगा येथील हिंदू मुस्लिम धर्मियांचे श्रध्दास्थान व शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सय्यद बाशा देवस्थानची यात्राही रद्द करण्यात आली आहे. रविवारी सरपंच श्रीशैल ओवांडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी सरपंच नागनाथ पाटील, उपसरपंच गुरूनाथ यादव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आदिनाथ भोजराव, पोलीसपाटील संतोष यादव व पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.