दरम्यान, महावितरणच्या या कारवाईनंतर केसरजवळगा येथील शेतकऱ्यांनी गावातील भाजपाचे तालुका चिटणीस लोकेश बिराजदार यांच्या उपस्थितीत मुरुम येथील महावितरणचे मुरुम ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता सागर सायगावकर यांची भेट घेऊन वीजपुरवठा पुर्ववत करा अन्यथा कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला. यानंतर महावितरणने दिवसांतून रोज एक तास जनावरे व पिण्याच्या पाण्यासाठी वीजपुरवठा सुरु करण्याचे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना दिले. त्याची अमंलबजावणी देखील मंगळवारी सायंकाळी चार नंतर सुरु झाली.
यासंदर्भात महावितरणचे मुरुम ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता सागर सायगावकर यांनी म्हणाले, आलूर व मुरुम वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांकडे अनेक वर्षापासुन लाखो रुपये वीज बील थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी थेट उपकेंद्रातूनच शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. ज्या रोहित्रावर वीज जोडणी असलेल्या शेतकऱ्यांकडे ७० टक्क्यापेक्षा जास्त थकबाकी आहे, त्या रोहीत्राची वीज खंडीत केली जात असल्याचे ते म्हणाले.