माणसे वाचणाऱ्यांचा आत्मविश्वास हरवत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:44+5:302021-04-01T04:32:44+5:30
उस्मानाबाद : आयुष्य हे अनमोल आहे. दैनंदिन जीवनामध्ये छोट्या-छोट्या विनोदावरदेखील मनमुराद हसता आले पाहिजे, त्यातला आनंद शोधता आला पाहिजे. ...
उस्मानाबाद : आयुष्य हे अनमोल आहे. दैनंदिन जीवनामध्ये छोट्या-छोट्या विनोदावरदेखील मनमुराद हसता आले पाहिजे, त्यातला आनंद शोधता आला पाहिजे. पुस्तके तर सगळेच वाचतात, पण माणसांना वाचायला शिकले पाहिजे. जो व्यक्ती माणसे वाचतो, त्याचा आत्मविश्वास हरवत नाही, असे प्रतिपादन ॲड. विनयकुमार नखाते यांनी केले. येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बेसिक सायन्स ॲण्ड ह्युमिनिटी विभागाने प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘तणावमुक्त जीवन प्रणाली’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी ॲड. नकाते बोलत होते. या वेबिनारसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, उपप्राचार्य प्रा. एम. डी. पाटील, विभागप्रमुख प्रा. उषा वडणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड. नकाते यांनी तणावमुक्त आयुष्य कसं जगावं, याची अनेक उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना मनमुराद हसवत ठेवले. प्राचार्य डॉ. माने, विभागप्रमुख प्रा. उषा वडणे, प्रा सुनीता गुंजाळ यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमासाठी प्रथम वर्षातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.