तामलवाडी : जिल्हास्तरीय पुरस्कारानंतर आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आमचे प्रयत्न राहणार आहेत. तसेच या पुरस्काराची रक्कम आणि शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकासा साधण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही तुळजापूर तालुक्यातील काटीचे सरपंच आदेश कोळी यांनी दिली. ग्रामविकास विभागामार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार तुळजापूर तालुक्यातील काटी व लोहारा तालुक्यातील जेवळी या गावांना विभागून देण्यात आला. याचे वितरण मंगळवारी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे शेतकरी प्रदीप साळुंके, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, पं.स. सदस्य रामहरी थोरबोले, अतुल सराफ, करीम बेग, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, सुहास साळुंके, हेरार काझी, अनिल बनसोडे, अविनाश वाडकर, भैरी काळे, नामदेव काळे, सतीश देशमुख, शिवलिंग घाणे, राजू वाडकर, संजय महापुरे, संजोगता महापुरे, प्रज्ञा साळुंके, भामाबाई घाणे, ज्योती कांबळे, मैनाबाई काळे, हाजीबेगम काझी, ग्रा.पं. कर्मचारी प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले विलास सपकाळ, अनिल बनसोडे, सविता बनसोडे, पोपट बोराडे आदी उपस्थित होते.