व्यावसायिक, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:30 AM2021-03-24T04:30:45+5:302021-03-24T04:30:45+5:30
उमरगा : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रामुख्याने नागरिकांचा संपर्क येणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांच्या चाचण्या ...
उमरगा : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रामुख्याने नागरिकांचा संपर्क येणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांच्या चाचण्या तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी तहसीलदार संजय पवार व मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून शहरातील सर्व व्यावसायिकांना बुधवारपासून कोविड चाचणी बंधनकारक केली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिकांना तारखेनुसार कोविड तपासणीसाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. यानुसार बुधवारपासून शहरातील पालिकेच्या अंतुबळी पतंगे सभागृहात तपासणी केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रत्येकी ५० व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी सर्वांना बंधनकारक आहे. तपासणी न केल्यास दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल व आस्थापनेचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.