वाशी येथे काॅंग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:20+5:302021-03-05T04:32:20+5:30
वाशी - मागील काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ हाेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाही केंद्रातील ...
वाशी - मागील काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ हाेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाही केंद्रातील माेदी सरकार बाेलायला तयार नाही, असा आराेप करीत वाशी येथील पेट्राेल पंपावर काॅंग्रेसच्यावतीने आंदाेलन करण्यात आले. पंपावर गाजरांचे वाटप करून निषेधही नाेंदविला.
पेट्राेल, डिझेलसाेबतच गॅस सिलिंडरच्या दरामध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. तीही २० ते २५ रुपयांच्या फरकाने. त्यामुळे सर्वसामान्यांसह वाहनधारकांचे कंबरडे माेडले आहे. एवढेच नाही, तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही परिणाम हाेऊ लागला आहे. याबाबत देशभरातून संताप व्यक्त हाेत असतानाही, केंद्रातील माेदी सरकार याबाबतीत काहीच बाेलायला तयार नाही, असा आराेप करीत काॅंग्रेस पक्षाच्यावतीने वाशी येथील पेट्राेल पंपावर गाजरांचे वाटप करून गांधीगिरी केली. तसेच मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. आंदाेलनात काँग्रेस सेवदलाचे विलास शाळू, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अवधूत क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस शामराव भोसले, महिला जिल्हा सरचिटणीस स्नेहल स्वामी, जिल्हा सरचिटणीस भूषण देशमुख, युवक जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह तागडे, तालुकाध्यक्ष राजेश शिंदे, सेवादल तालुका अध्यक्ष रावसाहेब शिंदे, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष नथुराम गायकवाड, बाळासाहेब गपाट, बाळासाहेब शिंदे, उध्दव तात्या कवडे, नानासाहेब करडे, नशिर पठाण, सुरेश ठोकळ, बापूराव भोसले आदी सहभागी झाले हाेते.