वंचित शेतकर्यांना पीक विमा मिळवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:27 AM2021-01-09T04:27:10+5:302021-01-09T04:27:10+5:30
फोटो (८-१) बालाजी बिराजदार लोहारा : पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी संबंधित विमा कंपनीस ...
फोटो (८-१) बालाजी बिराजदार
लोहारा : पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी संबंधित विमा कंपनीस सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके खा. शरद पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केली.
लोहारा तालुक्यातील एकूण ५९,२४८ शेतकऱ्यांनी यावर्षीचा प्रधानमंत्री खरीप पीक विमा उतरविला होता. यामध्ये प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन आदी पिकांचा समावेश होता. ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील बहुतांश भागात सलग दोन दिवस अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सरसकट मदत दिली. परंतु शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला असतानाही विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकली नाही. विमा कंपनीने ७२ तासाची जाचक अट घातल्याने शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित राहिला आहे. सदरील प्रश्नी लक्ष घालून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी साळुंके यांनी खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकउे केली.