तुळजापूर - काेराेना संसर्ग राेखण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाची काटेकाेर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पालिकेकडून दाेन पथके स्थापण्यात आली आहेत. साेमवारी या पथकाने शहरामध्ये फिरून नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांसह विनामास्क वावरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दाेन पथके स्थापन करण्यात आली हाेती. कार्यालय अधीक्षक वैभव पाठक व वैभव अंधारे यांच्या नेतृत्वातील दाेन्ही पथकांची शहरामध्ये फिरून आढावा घेतला. यावेळी जवाहर गल्ली येथील दूध डेअरी सील करण्यात आली. तसेच श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील प्रासादिक भंडार जागा मालक तसेच भाडेकरू यांच्याविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी १ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. मुथूट फायनान्सकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसले नाही. अनेक खातेदार विनामास्क आढळून आले. फायनान्सला १ हजाराचा दंड केला. तर विनामास्क लाेकांना प्रत्येकी २०० या प्रमाणे १ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले. या माेहिमेत खालेद सिद्दिकी, संतोष इंगळे, ज्ञानेश्वर टिंगरे, विश्वास मोटे, दत्ता डोंगरे आदींची उपस्थिती हाेती.