कळंब येथे प्रथमच रंगला फुटबॉलचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:13 AM2021-02-05T08:13:35+5:302021-02-05T08:13:35+5:30

कळंब : शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत कळंब येथील सिटीजन फाऊंडेशन आणि मोहेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डिकसळ येथील मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा ...

Rangala football thrill for the first time at Kalamb | कळंब येथे प्रथमच रंगला फुटबॉलचा थरार

कळंब येथे प्रथमच रंगला फुटबॉलचा थरार

googlenewsNext

कळंब : शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत कळंब येथील सिटीजन फाऊंडेशन आणि मोहेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डिकसळ येथील मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर सोमवारी फुटबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी क्रीडा प्रशिक्षक लक्ष्मण मोहिते, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, प्राचार्य डॉ. सुनील पवार, मुस्तान मिर्झा, उपप्राचार्य सतीश लोमटे, क्रीडा शिक्षक प्रा. बोंदर, कळंब मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद पोते, अरविंद शिंदे, हनुमंत चौधरी, अशोक चोंदे आदी उपस्थित होते.

कळंबमध्ये पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिटीजन फाऊंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम असून, यापुढे हॉकीचे सामने कळंबमध्ये ठेवण्यात यावे, असे प्रतिपादन डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केले. प्राचार्य डॉ. सुनील पवार, लक्ष्मण मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेसाठी मुंबई, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद येथील संघांनी नाव नोंदणी केली असल्याचे संयोजकांनी सांगितले.

स्पर्धेसाठी राजकुमार ढगे, कार्तिक इंगळे, अतुल मुंढे, आशिष चंदनशिव, आकाश कल्याणकर, शरद देशमुख, ज्ञानेश्वर नरटे आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मुस्तान मिर्झा यांनी तर आभार लक्ष्मण मोहिते यांनी मानले.

Web Title: Rangala football thrill for the first time at Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.