अणदूर : येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने गुरूवारी नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. उमाकांत चन्नशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच नागनाथ कुंभार, सदस्य धनराज मुळे ,बाळकृष्ण घोडके पाटील, बालाजी घुगे, सरिता मोकाशे, डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. विवेक बिराजदार, गणेश सूर्यवंशी, अनुसया कांबळे, मोतनबी इनामदार, अनिता घुगरे, स्नेहा मुळे, गोदावरी गुड्ड, उज्वला बंदपट्टे, जयश्री व्हटकर, देवकी चौधरी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दमयंती महिला पतसंस्थेच्या वतीने नवोदित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारूती खोबरे, संगमेश्वर जळकोटे, माजी जि. प. सदस्य नागनाथ कांबळे, माजी जि. प. सदस्य पार्वती घोडके, माजी पं. स. सभापती बालाजी मोकाशे, अरविंद आलुरे, विक्रम आलुरे, डॉ. अशोक चिंचोले, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, प्रकाश जेवळे, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लेकीचाही गौरव
अणदूरची लेक व ईटकळ सासर असलेल्या राजश्री राहुल बागडे या ईटकळ गावच्या सरपंच झाल्या आहेत. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी हभप गहिनीनाथ औसेकर महाराज, जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण, नूतन सरपंच रामचंद्र आलुरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उमाकांत चन्नशेट्टी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. एम. बी. बिराजदार यांनी केले. यासाठी प्रा. मल्लीनाथ लंगडे, डॉ. एस. व्ही. राजमाने, प्रा. सूर्यकांत आगलावे, डॉ. अनिता मुदकन्ना, डॉ. मिना जाधव, डॉ. अंकुश कदम, प्रा. एस. जी. बिराजदार, प्रा. एस. आर. भारती, प्रा. एस. के. कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक, विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, महिला, ग्रामस्थ, विद्यार्थ्यी उपस्थित होते.
फोटो--१) अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या वतीने नूतन सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सन्मान कार्यक्रमात दिपप्रज्वलन करताना हभप गहिनीनाथ औसेकर महाराज, जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण, प्राचार्य डॉ. उमाकांत चन्नशेट्टी, सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार आदी.
२) नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान करताना हभप गहिनीनाथ औसेकर महाराज, जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण, प्राचार्य डॉ. उमाकांत चन्नशेट्टी आदी.