जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णासोबत चर्चा केली. रुग्णांना मिळत असलेल्या सुविधांची चौकशी करून जेवणाचा दर्जा सुधारण्याबाबत सूचना दिल्या. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या काही व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याने नगरपालिकेने लक्ष ठेवावे, कंटेन्मेंट झोन व मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करावेत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, ज्या इमारतीमध्ये पाच पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील त्या इमारती सील कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीस आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक बडे, मुरूमचे डॉ. बाबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, सपोनि सिद्धेश्वर गोरे, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक तुलसीदास वराडे, मुरूमचे मुख्याधिकारी हेमंत कुरुलकर आदींची उपस्थिती होती.
उमरग्यातही घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:32 AM