व्हॉलिबॉल स्पर्धेत साईराज संघ ठरला विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:43 AM2021-02-27T04:43:43+5:302021-02-27T04:43:43+5:30

उमरगा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून शहरातील शरणाप्पा मलंग विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत उमरग्याचा ...

The Sairaj team emerged victorious in the volleyball tournament | व्हॉलिबॉल स्पर्धेत साईराज संघ ठरला विजेता

व्हॉलिबॉल स्पर्धेत साईराज संघ ठरला विजेता

googlenewsNext

उमरगा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून शहरातील शरणाप्पा मलंग विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत उमरग्याचा साईराज संघ विजेता ठरला. तर देवा संघाला उपविजेता संघाचा मान मिळाला. मंगळवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यानंतर युवा सेनेचे किरण गायकवाड, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देण्यात आले.

उमरगा शहरातील महादेव गणेश मंडळ, ब्रह्मदेव गणेश मंडळ, हिंदकेसरी प्रतिष्ठान, शिवशंभो प्रतिष्ठान, महादेव गल्ली व शिंदे गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लातूर, आळंद (कर्नाटक), सोलापूर व उमरगा येथील २२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत अव्वल ठरलेल्या साईराज ग्रुपला प्रथम पारिताेषिक मिळाले. राेख अकरा हजार व चषक देण्यात आले. बेस्ट सर्विस मॅनचा मान लातूरच्या फ्रेंडस संघाचा सलीम शेख (लारा) यांना, बेस्ट शूटरचा मान देवा ग्रुपचा मल्लिकार्जुन यांना तर बेस्ट लिफ्टरचा मान सोलापूरच्या अजिंक्यला देण्यात आला. बेस्ट पंच म्हणून अमजद बेग यांचा सन्मान करण्यात आला. विजेत्या संघाला व खेळाडूंना किरण गायकवाड, दिग्विजय शिंदे, सचिन जाधव, योगेश तपसाळे, शरद पवार, ॲड. अमित सांगवे, नगरसेवक महेश माशाळकर, आकाश शिंदे आदींच्या हस्ते पारितोषक देण्यात आले.

स्पर्धेत पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू रणजित ठाकूर, बाबू लांडगे, बेग, मुनीर शेख यांनी काम पाहिले. प्रा. सचिन शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विनोद कोराळे, अभंग शिंदे, नितीन सुरवसे, शिवशंकर पाटील, अमोल मिरकले, महेश माशाळकर, राजेश शिंदे, अमर शिंदे, दिनेश शिंदे, रतन पाटील, सूरज पाटील, सन्नी पाटील, निखील बिराजदार आदींनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: The Sairaj team emerged victorious in the volleyball tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.