साहेब,कोरोना नव्हे पण पीपीई कीटने मरु !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:29 AM2021-04-03T04:29:12+5:302021-04-03T04:29:12+5:30
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आरोग्य यंत्रणा पूर्णक्षमतेने गेल्या वर्षभरापासून अहोरात्र परिश्रम घेत आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, तसेच ...
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आरोग्य यंत्रणा पूर्णक्षमतेने गेल्या वर्षभरापासून अहोरात्र परिश्रम घेत आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, तसेच कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार व्हावेत, यासाठी पीपीई कीटचा वापर केला जातो.आरोग्य विभागाकडे रुग्णांवर उपचार करताना पीपीई कीटशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई कीटच वापरली जात आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात अचानक वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशा उष्ण तापमानात डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पीपीई कीट वापरणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर कर्मचाऱ्यांवर पीपीई कीटने मरण्याची वेळ येईल असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रतिक्रिया...
कोरोना कक्षात ड्युटी करीत असताना दिवसभर कीट अंगात ठेवावे लागते. बऱ्याचवेळेला गुदमरायला देखील होते.
आरोग्य कर्मचारी
अंगात कीट असल्यामुळे जो पर्यंत कोविड कक्षात आहोत. तोपर्यंत पाणीही पिता येत नाही. शिवाय, उष्णतेमुळे अंग घामाघूम होत आहे.
आरोग्य कर्मचारी
कोरोनापासून बचाव होण्यासाठी पीपीई कीट मोलाची भूमिका बजावते हे जरी खरे असले तरी दिवसातील ८ तास ते अंगात असल्याने त्रास होताे.
आरोग्य कर्मचारी
२०५३५
एकूण कोरोना बाधित
१८०७९
बरे झालेले रुग्ण
१८६०
उपचार सुरु असलेले रुग्ण
५९६
बाधितांचा मृत्यू
कोट...
कोविड कक्षात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी पीपीई कीट घालावे लागते. सध्या ८ तासाच्या ड्युट्या आहेत. मात्र, उन्हामुळे ४ तासाच्या अंतराने रोटेशन ड्युटी करण्यास कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.
डॉ. इस्माईल मुल्ला,
कोविड नोडल अधिकारी,