कोविड उपाययोजनांबाबत सोनारीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:46+5:302021-04-14T04:29:46+5:30
सोनारी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबवावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद उपसभापती धनंजय सावंत यांनी सोनारी ग्रामपंचायत कार्यालय ...
सोनारी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबवावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद उपसभापती धनंजय सावंत यांनी सोनारी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेतली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोनारी गावात सहा तर भैरवनाथ साखर कारखाना येथे रॅपिड स्टेस्टच्या माध्यमातून २० असे एकूण २६ रुग्ण सध्या सोनारी येथे पॉझिटिव्ह आहेत. येत्या दोन दिवसात सोनारी गावातील नागरिकांची कोरोना स्टेट घेतली जाणार असून, यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
बैठकीस नायब तहसीलदार एस.के. वाबळे, गटविकास अधिकारी सुरेश तायडे, विस्तार अधिकारी कावळे, अनाळा येथील वैद्यकीय अधिकारी साते, मंडळ अधिकारी कुंभार, तलाठी अतार, ग्रामसेवक व्ही.व्ही. मदने, माजी सरपंच नवनाथ जगताप, उपसरपंच भाऊसाहेब मांडवे, अंगद फरतडे, रामकृष्ण पाटील, आशा कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.