शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
4
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
5
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
6
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
7
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
8
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
9
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
10
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
11
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
12
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
13
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
14
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
15
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
16
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
17
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
18
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
19
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
20
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

ज्वारी अन्‌ कडब्यालाही भाव मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:29 AM

भूम : यंदा बाजारात ज्वारीसोबतच कडब्यालादेखील अपेक्षित भाव मिळत नसल्याने ज्वारी उत्पादक चांगलाच संकटात सापडला आहे. यामुळे कदाचित पुढील ...

भूम : यंदा बाजारात ज्वारीसोबतच कडब्यालादेखील अपेक्षित भाव मिळत नसल्याने ज्वारी उत्पादक चांगलाच संकटात सापडला आहे. यामुळे कदाचित पुढील काळात ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, यातून ज्वारीचे कोठार म्हणून असलेली तालुक्याची ओळख पुसली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

भूम तालुका हा पूर्वीपासूनच ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. या भागात शेतशिवारही उत्तम दर्जाचे व मुबलक पाणीदार असल्याने ज्वारी हे पीक जोमात येते. म्हणूच शेतकरीवर्गाचे ७० टक्के अर्थकारण या पिकावर आधारित असते. यासोबतच बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. यामुळे पशूंची संख्याही मोठी आहे. या पशुंना उन्हाळ्यात चारा म्हणून ज्वारीचे चिपाड वापरले जाते. यामुळे ज्वारी अन्‌ चाऱ्याचाही प्रश्न मिटत असल्याने बहुतांश शेतकरी आर्थिक अडचण असली तरी उसनवारी करून मोठ्या आशेने ज्वारीची पेरणी करतात.

तालुक्यात २० हजार ७६३ हेक्टर ज्वारी या पिकाचे सरासरी क्षेत्र असताना या हंगामात तब्बल २८ हजार ९०९ हेक्टर पेरणी झाली होती. ज्वारीला मागच्या वर्षी ३ हजार ५०० ते ४ हजार दरम्यान भाव मिळाला होता. तसेच ज्वारीच्या कडब्यासही १ हजार ६०० ते २ हजार भाव होता. तालुक्यातील ज्वारी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, बीड यांसारख्या मोठ्या शहरात व्यापारी वर्गाच्या वतीने पाठवण्यात येते. विशेषत: जूट, दगडी व मालदांडी या तीनही प्रकारच्या ज्वारीचे उत्पन्न तालुक्यात होते. यावर्षी ऐन कणीस भरणीच्या वेळेस तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारीचे कोठार आडवे पडले. ज्वारीचे चिपाड खाली पडल्याने कणीस भरले नाही. शिवाय, जे कणीस भरले तेही मळणीनंतर काळे व डागिल झाल्याने या वेळेस ज्वारीस केवळ १६०० ते १८०० भाव मिळत आहे. कडब्याचे दरदेखील १२०० ते १५०० आले आहेत. तसेच मागणीदेखील कमी झाली. असे असताना दुसरीकडे मजुरांची रोजंदारी मात्र वाढली आहे. यंदा मजुरांनी ७०० गुत्त्याने काम घेण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण गणितच कोलमडले. काढणीसाठी एकरी ६ हजार रुपये, तर एक ज्वारीची पेंडी बांधण्यास ३ रुपये भाव मजूर घेत असल्याने काढणी, बांधणी व मोडणी यातच शेतकऱ्यांचा दम घोटत आहे. त्यामुळे यापुढील काळात केवळ घरी खाण्यापुरतीच ज्वारी करायची, असा निराशावादी सूरही काही शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागल्याने तालुक्याचे ज्वारीचे कोठार हे नाव पुसून निघते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कोट.........

यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळेल, अशी आशा होती. याच भरवशावर पेरणी केली. परंतु, १ हेक्टरमधील ज्वारी काढण्यास व बांधण्यास ३० हजार रुपये खर्च आला असून, बाजारात ज्वारीचा भाव १६०० ते १८०० असल्याने झालेला खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे. यामुळे यापुढे केवळ घरी खाण्यापुरतीच ज्वारी करावी की काय, असा विचार चालू आहे.

- आकाश शेंडगे, शेतकरी, भूम

ज्वारी या पिकास प्रत्येक वर्षी चांगला भाव असतो. मात्र, यावेळेस अवकाळी पावसाने झाेडपल्याने ज्वारी दागिल झाली. शिवाय, लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाली आहे. परिणामी यंदा ज्वारीला अपेक्षित दर मिळाला नाही.

- भैय्या उंबरे, व्यापारी