दिंडोरी येथील शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 06:31 PM2019-02-01T18:31:56+5:302019-02-01T18:33:07+5:30
तालुक्यातील दिंडोरी येथील एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.
भूम (जि. उस्मानाबाद): तालुक्यातील दिंडोरी येथील एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिंडोरी येथील औदुंबर झांबरे (वय ४३) हे द्राक्ष उत्पादक शेतकरी होते. निसर्गाच्या अवकृपेमुळे मागील दोन वर्षात द्राक्ष शेती आतबट्ट्याची ठरली. त्यामुळे उत्पादन खर्चही हाती पडला नाही. सततच्या या नापिकीला कंटाळून औदुंबर झांबरे यांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर भूम ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. झांबरे यांच्याकडे दोन बँकांचे हर्जही होते, असे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे