दोन चालकांवर गुन्हे
उस्मानाबाद : येथील राहुल बिभीषण शिराळ व वडगाव येथील प्रदीप बाबासाहेब हजारे यांनी २३ फेब्रुवारी रोजी शहरातील बार्शी नाका व आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील महामार्गावर सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे केल्याचे निदर्शनास आले. यामुळे या दोघांविरुद्ध पोलिसांनी सरकारतर्फे पोलिसांनी दिलेल्या स्वतंत्र दोन फिर्यादीवरून येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
उमरगा : तालुक्यातील कवठा येथील दीपाली युवराज लिंबारे (वय २०) या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी दीपाली यांचे वडील सूर्यकांत मटगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपाली यांचे पती युवराज लिंबारे, सासू कविता लिंबारे, सासरे माधव लिंबारे, दीर लिंबराज लिंबारे व अतुल लिंबारे यांच्या विरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात भादंसंकलम ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात प्रकरणी एकाविरुध्द गुन्हा
वाशी : दोन दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १५जानेवारी रोजी घडली होती.याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गंभीरवाडी शिवारातील रस्त्यावर एमएच २५/ एआर २५३२या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून आलेल्या दुचाकीला (क्र.एमएच २५/ एजी ७५४७)जोराची धडक दिली.यात दुचाकी चालक रामेश्वर डोईफोडे हे जखमी होऊन मयत झाले. याप्रकरणी मयताचा भाऊ बालाजी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.