नळीवडगाव येथील गहिनीनाथ लोखंडे हे मागील अनेक वर्षांपासून नळीवडगाव फाट्यावर अनेक निराधार, वयोवृद्ध नागरिकांचा मोफत सांभाळ करीत आहेत. या निराधार वृद्धांना सदरील वृद्धाश्रमाचा मोठा आधार मिळत आहे. लाेखंडे हे गावाेगावी फिरून धान्य, भाजीपाला गाेळा करून निराधारांना खाऊ घालतात. परंतु, सध्या काेराेनामुळे लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. अशा काळात गावाेगावी फिरणे शक्य नाही. त्यामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांवर उपासमारीची वेळ आली हाेत. ही बाब समजल्यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ साहेब व साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी वृद्धाश्रमास दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य भेट दिले. यावेळी स्वत: पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पाथरूड बिटचे घाडगे, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस गणेश शाळू, औदुंबर जाधव, सोमनाथ तातखिळे, पंकज पंडित, ऋषिकेश कुठे, सुनील मुंडे, लक्ष्मण बोराडे, आदी उपस्थित हाेते.
वृद्धाश्रमास दिले दोन महिन्यांचे किराणा साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:26 AM