आठवडाभरात लसीकरण सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:30 AM2021-03-24T04:30:43+5:302021-03-24T04:30:43+5:30

(लोकमत इफेक्ट) समुद्रवाणी : उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ चे लसीकरण काही जुजबी कारणाने बंद होते. या ...

Vaccination will begin within a week | आठवडाभरात लसीकरण सुरू करणार

आठवडाभरात लसीकरण सुरू करणार

googlenewsNext

(लोकमत इफेक्ट)

समुद्रवाणी : उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ चे लसीकरण काही जुजबी कारणाने बंद होते. या अनुषंगाने मंगळवारी रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा होऊन आठवडाभरात लसीकरण चालू करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित काकडे यांनी सांगितले.

रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष उपळा गटाचे जि. प. सदस्य अभिमन्यू शितोळे, पंचायत समितीचे उपसभापती आशिष नायकल, पं.स. सदस्य सुवर्णा इरकटे, कुसुम इंगळे, प्रदीप शिंदे, विस्ताराधिकारी रमाकांत हजारे, उपसरपंच रामभाऊ गव्हाणे, विष्णू ढवळे, शेंदरकर आदी सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

समुद्रवाणी येथे लसीकरण करण्यायोग्य इमारत नसल्याने अद्याप यास सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे गोरोबा काका नगर, सांजा गावापासून वाघोली, सारोळा, दारफळ, शिंदेवाडी, राजुरी, कामेगाव, सांगवी, लासोना व समुद्रवाणी या गावातील नागरिकांची लसीकरणासाठी गैरसोय होत आहे. येथील वयोवृद्ध व दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरणासाठी कुठे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने १८ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा होऊन आठवडाभरात हे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून बेबी किट व पैंजण वाटप करण्यात आले.

पोलीस पाटलांना लसीकरण सुरू

जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला करताना प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पोलीस पाटलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबतही प्रशासनाकडून कुठल्याच हालचाली होत नव्हत्या. याबाबतही ‘लोकमत’ने २३ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर प्रशासनाने जिल्हाभरातील पोलीस पाटलांनादेखील मंगळवारपासून लसीकरण सुरू केले आहे.

Web Title: Vaccination will begin within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.