नगरसेविका सुनंदाताई वरवटे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या रुकसाना मुंगले, केंद्रप्रमुख शीला मुदगडे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, मुख्याध्यापक बाबूराव पवार यांची उपस्थिती हाेती. यावेळी शिक्षकांनी घरोघरी जाऊन पहिलीच्या वर्गात ४० मुलांना प्रवेश दिला. तर ५ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. दरम्यान, मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात खंड पडू देऊ नका, असे आवाहन पालकांना करण्यात आले. ज्यांच्याकडे माेबाईलची साेय नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वाध्याय वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी दिली. यावेळी प्रशालेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख सरिता उपासे, ममता गायकवाड, सोनाली मुसले, शिल्पा चंदनशिवे, बलभीम चव्हाण, सदानंद कुंभार ,संजय रुपाजी, वैशाली चिट्टे, सुवर्णा इंगळे, महानंदा कारागीर, सुरेखा मुलगे व अनिता लोहार आदी उपस्थित हाेते.
घराेघरी जाऊन नवागतांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:43 AM