धुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे हरभºयाचे १० कोटी रूपये शासनाकडे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:34 PM2018-05-26T12:34:33+5:302018-05-26T12:34:33+5:30
चार केंद्रावर खरेदी सुरू, आतापर्यंत २२ हजार ६६८ क्विंटर हरभरा खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नाफेडच्यावतीने धुळे जिल्ह्यातील चार केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने हरभºयाची खरेदी सुरू झालेली आहे. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यातील शेतकºयांकडून तब्बल २२ हजार ६६८.७५ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र त्याचे ९ कोटी ९७ लाख ६ हजार रूपये शासनाकडे थकलेले आहेत. अद्याप एकाही हरभरा विक्रेत्या शेतकºयाला पैसे मिळालेले नाहीत.
राज्य शासन व नार्फेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन, तूर पाठोपाठ आता हरभºयाची आॅनलाइन खरेदी सुरू केली. आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ५ मार्च १८ पासून ही खरेदी सुरू झालेली आहे. तर आता २९ मे १८ पर्यंत ही आॅनलाइन खरेदी सुरू राहणार आहे.
हरभºयाची प्रथमच खरेदी
गेल्यावर्षी नाफेडतर्फे हरभरा आॅनलाइन खरेदी करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच आॅनलाइन नोंदणी पद्धतीने खरेदी केला जात आहे.
४४०० रूपये भाव
राज्य शासनाच्यावतीने हरभºयासाठी प्रतिक्विंटल ४२५० हभीभाव व १५० रूपये बोनस असा एकूण ४४०० रूपयांचा भाव जाहीर केलेला आहे. तर खुल्या बाजारात ३२०० ते ३४०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. खुल्या बाजारापेक्षा नाफेडतर्फे चांगला भाव मिळत असल्याने, शेतकºयांनी गर्दी होत आहे.
धुळे जिल्ह्यातील चार केंद्रावर २ हजार ४०३ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १ हजार ६२८ शेतकºयांकडून २२ हजार ६६८.७५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलेला आहे. त्याचे पैसे ९ कोटी ९७ लाख ४२ हजार ५०० रूपये झाले आहेत.
शेतकºयांना पैसे मिळालेले नाही
हरभरा खरेदी नंतर शेतकºयांच्या बॅँक खात्यावरच १५ दिवसात आॅनलाइन पैसे जमा होणार होते. मात्र हभरा खरेदी होऊन एक-दी महिन्या होवूनही दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांचे १७ कोटी ९ लाख ६ हजार २० रूपये पेमेंट थकलेले आहे. शेतकºयांना पैसे मिळण्याची प्रतीक्षा आहे. आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असतांना अजुनही हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने हरभरा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे.