तरूणाच्या बॅँक खात्यातून १.६० लाख परस्पर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 07:10 PM2019-04-06T19:10:50+5:302019-04-06T19:11:45+5:30
आॅनलाइन फसवणूक, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत
धुळे : एसबीआय क्रेडीट कार्ड येथून बोलत असल्याचे खोटे सांगूत अज्ञातांनी एका तरूण व्यावसायिकाच्या दोन बॅँक खात्यातील १ लाख ६० हजार ७१४ रूपयांची रक्कम आॅनलाइन पद्धतीने परस्पर काढून घेत फसवणूक केल्याची घटना ३० मार्च रोजी धुळ्यात घडली. याप्रकरणी ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील साडी विक्री करणारे सागर सुभाष पिंगळे (३०, रा. डोंगरे महाराज नगर,धुळे) यांच्या मोबाईलवर दोन वेगवेगळ्या क्रमांकाने फोन आले. आम्ही एस.बी.आय.क्रेडीट कार्ड येथून बोलत असल्याची खोटी माहिती त्यांनी पिंगळे यांना देवून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी पिंगळे यांच्या स्टेट बॅँकेच्या खात्यातून अनुक्रमे ६० हजार ९०७ व ३८ हजार ९०० रूपये तसेच एच.डी.एफ.सी. बॅँकेच्या खात्यातून ६० हजार ९०७ रूपये असे एकूण १ लाख ६० हजार ७१४ रूपये आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक केली. ही घटना ३० मार्च रोजी दुपारी ३.५६ ते सायंकाळी ४ वाजून १७ मिनीटांच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी सागर पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करऱ्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आहेर करीत आहेत.