पिंपळनेर : शेतकºयाच्या शेतातून एक-दोन नव्हे तर तब्बल २०० क्विंटल कांद्याची चोरी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावाच्या शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत सुमारे ६० हजार रुपये एवढी आहे़ साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील निलेश बाबुराव पगारे (३२) या तरुण शेतकºयाने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, देशशिरवाडे गावाच्या शिवारात असलेल्या श्रीराम वसंत कोठावदे यांचे शेत आहे़ या शेतात कांद्याच्या पिकांची लागवड केली होती़ २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्याने हातसफाई केली आहे़ चोरट्याने जवळपास २०० क्विंटल कांदा चोरुन नेला असून त्याचे बाजारमूल्य ६० हजार इतके आहे़ सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर शेतात कांदा दिसून आला नाही़ त्यामुळे कांद्याची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी निलेश पगारे यांनी फिर्याद दिली़ त्यानुसार, रविवारी सकाळी ११ वाजता पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ हेड कॉन्स्टेबल कोकणी घटनेचा तपास करीत आहेत़ दरवाढीनंतर कांद्याची चोरी होण्याची या भागात ही पहिलीच घटना आहे़
शेतातून २०० क्विंटल कांद्याची झाली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:26 PM