वज्रेश्वरीजवळ अपघात धुळ्याचे वऱ्हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:20 PM2017-12-11T13:20:44+5:302017-12-11T18:34:47+5:30

जीवितहानी टळली : बस पुलावरुन कोसळली

Accident, Dhule and bone injury near Vajreshwari | वज्रेश्वरीजवळ अपघात धुळ्याचे वऱ्हाडी जखमी

वज्रेश्वरीजवळ अपघात धुळ्याचे वऱ्हाडी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देभिवंडीनजिक लक्झरी बस कोसळून झाला अपघातजखमींमध्ये धुळ्याच्या वाघ कुटुंबियांचा समावेशसुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भिवंडीनजिक अंबाडी-वजे्रश्वरी रस्त्यावरील सैतानी पूल येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास लक्झरी बस पुलावरुन खाली कोसळली़ यात जखमी झालेले वाघ कुटुंबिय धुळ्याचे होते़ ते वसई येथे लग्नासाठी जात असताना ही घटना घडली़ सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली़ 
धुळे तालुक्यातील चितोड येथे राहणारे प्रकाश शंकर वाघ यांची मुलगी माधुरी आणि डोंबिवली येथील भिमराव बाबुराव साळवे यांचे चिरंजीव अविराज यांचा विवाह रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता होता़ पालघर जिल्ह्यातील वसई येथील श्री सुकृतींद्र कलामंदिर, पहिला मजला जीएसबी समाज सेवा संघ, पारनाका याठिकाणी विवाह असल्यामुळे धुळ्यातून वाघ कुटुंबिय एका लक्झरी बसने लग्नस्थळाकडे रवाना झाले होते़ लग्नाचे वºहाड घेवून जाणाºया खासगी बसला भिवंडी तालुक्यातील वजे्रश्वरी -अंबाडी रस्त्यावरील सैतानी पूल येथे अपघात झाला़ लक्झरी बस पुलावरुन खाली ७० फूट कोसळली़ भरधाव वेगाने बस चालविणाºया चालकाला वºहाडी मंडळींनी वारंवार सांगूनही त्याने दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत आहे़ भरधाव वेगात ओव्हरटेक करणाच्या नादात बस चालकाचे नियंत्रण सुटले़ परिणामी बस खाली कोसळली़ या अपघातात धुळ्यातील सरला संजय वाघ, मनोज वाघ, भगवान वाघ, लहू वाघ यांच्यासह अन्य जखमी झाले आहेत. 
अपघाताची माहिती कळताच वजे्रश्वरी येथे राहणारे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे सुपरवायझर मिलींद कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ स्थानिकांच्या मदतीने त्यांनी बसमधील जखमींना बाहेर काढले़ आणि त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ 

Web Title: Accident, Dhule and bone injury near Vajreshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.