पळासनेर नाकाबंदीत ट्रॅव्हल्समध्ये आढळला अफू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:08 PM2019-03-28T12:08:14+5:302019-03-28T12:08:44+5:30
तरुण ताब्यात : शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील पळासनेर येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी नाकाबंदी लावली होती़ शिरपूर तालुका पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत एमपी ३० पी ५००२ या क्रमांकाची इंदूरकडून मुंबईकडे जाणाºया ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता त्यात अफुची सुकलेली बोंड आणि चुरा असा ५१ हजार ७२० रुपयांचा पदार्थ आढळून आला़ ही कारवाई गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास झाली़ याप्रकरणी सुरेश जगदीशराम बिश्नोई (२२, जोधपूर, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई उपअधीक्षक संदीप गावित, सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, योगेश ढिकले, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख, हेड कॉन्स्टेबल माळी, मोरे, फुलपगारे, वानखेडे, अनंत पवार, पाटील, श्याम पावरा, गोविंद कोळी, संजीव जाधव यांनी केली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले घटनेचा तपास करीत आहेत़