लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी माथेफिरुला तीन दिवसात अटक करा़ अन्यथा, आंदोलन उभारले जाईल अशी भूमिका दलित संघटनांनी घेतली़ माथेफिरुला अटक केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे शांतता प्रस्थापित झाली़ दरम्यान, पुतळा पाण्याने स्वच्छ धुण्यात आला असून हार अर्पण करण्यात आला़ बुध्दवंदना म्हणण्यात आली़ जिल्हा परिषदेचे कामकाज बंद करण्यात आले़जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची कोणीतरी माथेफिरुने विटंबना केली आहे़ माहिती मिळताच दलित संघटनेचे एम़ जी़ धिवरे, वाल्मिक दामोदर, संजय पगारे, शशिकांत वाघ, किरण जोंधळे, शंकर थोरात, बाबुराव नेरकर, सुरेश लोंढे, अनिल दामोदर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हा परिषदेत दाखल झाले़ विटंबना करणाºया माथेफिरुला अटक करा अशी घोषणाबाजी करण्यात आली़ अध्यक्षांना धक्काबुक्कीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते देखील जिल्हा परिषदेत दाखल झाले़ आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले़ पण, गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांच्याशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्यावर हात देखील उगारण्यात आला़ तात्काळ त्याला पोलिसांनी जेरबंद केले़ त्याने हात उगारला असल्याचे मान्य करत त्याच्याविषयी कोणतीही तक्रार माझी नसल्याची भूमिका शिवाजी दहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना घेतली़ जिल्हाधिकाºयांशी चर्चासंघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली़ त्यांच्याशी संवाद साधत माथेफिरुला तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली़ जिल्हाधिकाºयांनी देखील संशयितांला अटक केली जाईल असे आश्वासन दिले़ त्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले़ दरम्यान, जिल्हा परिषदेत काळा दिवस पाळण्यात आला असून कामबंद करण्यात आले़ घटनेचे गांभिर्य बघता पोलीस प्रशासनातील सर्वच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस तैनात होते़
धुळ्यात पुतळ्याची विटंबनाप्रकरणी माथेफिरुला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:33 PM
दलित संघटना : सर्वत्र व्यक्त झाला निषेध, जिल्हाधिकाºयांशी चर्चा
ठळक मुद्देधुळ्यात पुतळ्याची विटंबनामाथेफिरुला अटक करण्याची मागणीजिल्हा परिषदेचे कामकाज बंद