धुळ्यात उपअभियंत्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:57 PM2018-05-15T12:57:02+5:302018-05-15T12:57:02+5:30

युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

Attempts to throw ink on the subdivision in Dhule | धुळ्यात उपअभियंत्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न 

धुळ्यात उपअभियंत्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न 

Next
ठळक मुद्देचुकीच्या मीटर रीडिंगमुळे वाढीव वीज बिलांचा ग्राहकांना भूर्दंडमीटर बदल, रीडिंगच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलकांचा आरोप उपअभियंत्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी केली अटक 


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : युवक कॉँग्रेसतर्फे वीज ग्राहकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंगळवारी सकाळी वीज महावितरण कंपनीच्या साक्रीरोडवरील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शाब्दीक वाद होऊन खूर्च्या अस्ताव्यस्त करण्यता आल्या. तसेच वीज महावितरण कंपनीच्या अधिकाºयावर शाई फेकण्याचाही प्रयत्न झाला. परंतु तत्पूर्वी साध्या वेशात तेथे असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 
युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, नाजनीन शेख, बानूबाई शिरसाठ, सतीष रवंदळे, महेश कालरा, रिदवान अन्सारी, अलोक रघुवंशी, हर्षल पाटील आदी या आंदोलनावेळी उपस्थित होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कॉँग्रेस कार्यकर्ते वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात पोहचले. तेथे उपकार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांची भेट त्यांनी त्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले. 
गेल्या अनेक दिवसांपासून फेरफार केलेले मीटर कंपनीमार्फत जमा करण्यात आले आहेत. नवे मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र वीजबिलांचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडून जास्त वीज युनिटचा वापर दाखविला जाऊन वीजबिले दुप्पट येत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. आतापर्यंत वर्षनिहाय किती मीटर फेरफार केल्याच्या कारणावरून जमा केले, मीटर बदलण्याचे किती पैसे मिळतात याची लेखी माहिती मागितली. परंतु ते लगेच उपलब्ध न केल्याने यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी शाब्दीक वाद वाढत गेल्याने आणखी काही पोलिसांना पाचारण करण्यात आले. ते पोहचले त्याचवेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी उप कार्यकारी अभियंता मचिये यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत पोलिसांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या प्रकाराने आवारात तसेच जवळच्या कार्यालयांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. झाल्या प्रकाराने कर्मचारीही भांबावून गेले. मात्र  झाला प्रकार कळाल्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा कामकाज सुरू झाले. 


 

Web Title: Attempts to throw ink on the subdivision in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.