शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

धुळ्यात उपअभियंत्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:57 PM

युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

ठळक मुद्देचुकीच्या मीटर रीडिंगमुळे वाढीव वीज बिलांचा ग्राहकांना भूर्दंडमीटर बदल, रीडिंगच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलकांचा आरोप उपअभियंत्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी केली अटक 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : युवक कॉँग्रेसतर्फे वीज ग्राहकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंगळवारी सकाळी वीज महावितरण कंपनीच्या साक्रीरोडवरील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शाब्दीक वाद होऊन खूर्च्या अस्ताव्यस्त करण्यता आल्या. तसेच वीज महावितरण कंपनीच्या अधिकाºयावर शाई फेकण्याचाही प्रयत्न झाला. परंतु तत्पूर्वी साध्या वेशात तेथे असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, नाजनीन शेख, बानूबाई शिरसाठ, सतीष रवंदळे, महेश कालरा, रिदवान अन्सारी, अलोक रघुवंशी, हर्षल पाटील आदी या आंदोलनावेळी उपस्थित होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कॉँग्रेस कार्यकर्ते वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात पोहचले. तेथे उपकार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांची भेट त्यांनी त्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले. गेल्या अनेक दिवसांपासून फेरफार केलेले मीटर कंपनीमार्फत जमा करण्यात आले आहेत. नवे मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र वीजबिलांचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडून जास्त वीज युनिटचा वापर दाखविला जाऊन वीजबिले दुप्पट येत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. आतापर्यंत वर्षनिहाय किती मीटर फेरफार केल्याच्या कारणावरून जमा केले, मीटर बदलण्याचे किती पैसे मिळतात याची लेखी माहिती मागितली. परंतु ते लगेच उपलब्ध न केल्याने यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी शाब्दीक वाद वाढत गेल्याने आणखी काही पोलिसांना पाचारण करण्यात आले. ते पोहचले त्याचवेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी उप कार्यकारी अभियंता मचिये यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत पोलिसांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या प्रकाराने आवारात तसेच जवळच्या कार्यालयांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. झाल्या प्रकाराने कर्मचारीही भांबावून गेले. मात्र  झाला प्रकार कळाल्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा कामकाज सुरू झाले. 

 

टॅग्स :Dhuleधुळेmahavitaranमहावितरण