लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील अरिहंत मंगल कार्यालयाजवळ असलेल्या चित्तरंजन कॉलनी परिसरात रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रिक्षा आणि कार जळाली़ या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले़ अग्नीशमन बंबाने आग विझविण्यात आली़ शहरातील अरिहंत मंगल कार्यालय आणि संपुर्ण परिसर सध्या धुळे पोलिसांच्या यादीवर अतिसंवेदनशिल म्हणून आहे़ या भागात कोणतीही घटना घडताच सर्वत्र अलर्ट होत असतात़ रविवारी दुपारी या भागात कार आणि रिक्षा जळाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ या भागात राहणारे फरीदाबी रशिदशहा यांच्याकडे लग्न सोहळा असल्यामुळे गर्दी होती़ अशातच रविवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास जाबीरशहा शौकत यांची एमएच ४१ ई ३५५२ क्रमांकाची कार आणि जुबेरशहा जाबीरशहा यांची एमएच १५ वाय ३९७१ क्रमांकाची रिक्षा अशी दोनही वाहने जळाली़ अचानक आगीचे लोळ दिसताच लग्न सोहळ्यातील बहुतेकांनी तिकडे धाव घेतली़ कार आणि रिक्षा जळत असल्यामुळे आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असताना महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले़ घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना कळताच त्यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली़ यात मात्र या दोनही वाहनांना आग लागली की लावली गेली, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही़ त्यादृष्टीने पोलिसांकडून शोध सुरु आहे़
धुळ्यात चित्तरंजन कॉलनीत कार, रिक्षा जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:23 PM
तणावाची होती स्थिती : अग्नीशमन बंबाने विझवली आग
ठळक मुद्देअरिहंत मंगल कार्यालयाजवळील घटनाकार आणि रिक्षा जळाल्याने तणावअग्नीशमन बंबासह पोलीस दाखल