लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक मंडळ शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेला गुरूवारपासून सुरूवात झाली. मराठीच्या पेपरला कॉपी करतांना भरारी पथकाने दोन विद्यार्थ्यांना पकडले. ग्रामीण भागातील काही केंद्रावरही किरकोळ कॉपीचे प्रकार घडले.या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ६३ केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली आहे. धुळे शहरात १३ केंद्रावर ही परीक्षा होत असून, जिल्ह्यात फक्त ४ उपद्रवी केंद्राची नोंद आहे.दहावाजेपासूनच गर्दीबोर्डाचा पहिला पेपर असल्याने, सकाळी दहावाजेपासूनच परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. केंद्रात आल्यावर अनेक विद्यार्थी आपला नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे, याची चाचपणी करतांना दिसून येत होते.परीक्षार्थींना केंद्रापर्यंत सोडण्यासाठी काहींचे पालक, मित्र आल्याने, केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर वाहतुकीची कोंडी झालेली होती.प्रवेशद्वाराजवळच अंगझडतीबारावीच्या परीक्षेला झालेला कॉपीचा प्रकार बघून मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांची चांगलीच कान उघडणी केली होती. परीक्षा केंद्रात कॉपी झाल्यास, गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम दहावीच्या पेपरला दिसून आला. कॉपी होवू नये म्हणून विद्यार्थी-विद्यार्थिनींची शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच तपासणी केली जात होती. त्यानंतरच विद्यार्थ्यांना आत सोडण्यात येत होते.१०.५० वाजता विद्यार्थ्यांच्याहाती पेपर१०.५० वाजताप्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातीयावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.दरम्यान परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्षत प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आले.दोन विद्यार्थ्यांना पकडलेपेपर सुरू असतांना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी धुळ्यात एकाला तर माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांनी पिंपळनेर येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याला मराठीच्या पेपरला कॉपी करतांना पकडले.भरारी पथकांच्या भेटीदरम्यान परीक्षेसाठी पाच भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून, या पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या.