धुळे : पांझरा नदीवरील सावरकर मार्गावरील कॉजवे पुलाची दुरूस्ती महापालिकेकडून केली जात आहे़ गेल्या आठवड्यापासून दुरूस्तीसाठी जेसीबीद्वारे पुलावरील डांबराचे खोदकाम केले जात आहे़ त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीला मोठा पूर आला होता़ एकाच महिन्यात दोन ते तीन वेळा पूर आल्याने कॉजवे पुलाचे कठडे तसेच रस्ते वाहून खड्डे पडले होते़ तर पुलाच्या खालील असलेल्या स्लॅबचे प्लास्टर निघून सळई दिसत होती़ मध्यतंरी पुलावरून अपघात झाल्याने वाहतूक बंद ठेवण्याचा निणर्य घेण्यात आला होता़ पुलाची दुरूस्तीचे उदघाटन १० सप्टेंबरला खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले होते़ अक्कलपाडातून पाणी सोडण्यात आल्याने काही दिवस पुलाच्या दुरूस्तीचे काम बंद करण्यात आले होते़ रविवारी पुन्हा सकाळी पुलावरील डांबरीकरण जेसीबीद्वारे काढण्याचे सुरू करण्यात आहे़
पुलावरील डांबरीकरण काढणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 10:33 PM