शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

उमेदवारांना २ एप्रिलपासून अर्ज सादर करता येणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:17 PM

जिल्हाधिकारी : लोकसभा निवडणूक; १० रोजी होणार छाननी, १२ पर्यंत माघार घेता येणार 

धुळे : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून धुळे मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास २ एप्रिलपासून सुरूवात होईल. ते ९ पर्यंत सादर करता येणार आहेत. १० रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार असून १२ पर्यंत माघारीची मुदत असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पत्रकारांसोबत पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ (नाशिक), उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सुरेखा चव्हाण,  धुळे उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, शिरपूर उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सुचिता भामरे, चंद्रजित राजपूत (मालेगाव) आदी अधिकारीही उपस्थित होते. मतदारसंघात आचारसंहितेचा अंमल सुरू झाला असून तिचा भंग होऊ नये यासाठी  ‘सी व्हिजिल’ अ‍ॅप यावेळी खास तयार करण्यात आला आहे. तो प्रत्येकजण मोबाईलवर डाऊनलोड करू शकतो. कुठे आचारसंहितेचा भंग होत असेल तर कोणीही त्याचा फोटो अथवा व्हीडीयो काढून या अ‍ॅपवर डाऊनलोड करू शकतो. तक्रारही करता येईल. तसेच त्या तक्रारीचे कसे निराकरण केले जात आहे, याची माहितीही तक्रारकर्त्यास मिळेल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. जिल्ह्यात मतदारांची एकूण संख्या १६ लाख ३६ हजार २३४ एवढी आहे. त्यात ८ लाख ४५ हजार ४१८ पुरूष मतदार तर ७ लाख ९० हजार ७९२ स्त्री मतदार तसेच २४ इतर मतदारांचा समावेश आहे. अनिवासी मतदार (एनआरआय) एकही नाही. मागील दोन निवडणुकींचा आढावा घेतला तर मतदानाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते, असे जिल्हाधिकारी म्हणाले. व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर यावेळी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर प्रथमच केला जाणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी यापूर्वी इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक गावोगावी दाखविण्यात आले आहे. अजून याबाबत जनजागृती केली जाईल. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी  ३ हजार ६३२ बॅलेट युनिट आणि प्रत्येकी २ हजार ११२ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे तसेच त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात बॅटºयाही प्राप्त झाल्या असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्यात १६४५ मतदान केंद्रे या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १६४५ मतदान केंद्रे असून १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांसाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्या केंद्रांवरच सहाय्यकारी मतदान केंद्र तयार केले जाणार आहेत. सध्या अशा मतदान केंद्रांची संख्या ६९ एवढी आहे. ९ एप्रिलनंतर कदाचित या संख्येत वाढ होऊ शकेल. त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. १ जानेवारी रोजी १८ वर्ष पूर्ण केलेल्या युवक, युवतींना नोंदणी करता येणार आहे. ९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणीची संधी युवक तसेच यापूर्वी नोंदणीपासून वंचित राहिलेले नागरिक येत्या ९ एप्रिलपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करू शकतील.  तसेच या मुदतीत नोंदणी करणाºया मतदारांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येईल, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली. विशेष नोंदणी मोहिमांदरम्यान झालेल्या नोंदणीत २५ टक्के युवा मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढेल, असा विश्वास व्यक्त झाला. बंदोबस्ताचेही नियोजन ही निवडणूक सुरक्षित व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बाहेरून जेवढा स्टाफ मागवावा लागेल, त्याची माहितीही देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तसेच राखीव मनुष्यबळही उपलब्ध असल्याचे रेखावार यांनी सांगितले. पदाधिकाºयांची वाहने जमा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची वाहने जमा करण्यात आली आहेत. त्यांची फोन सुविधाही थांबविण्याची सूचना केली आहे. मात्र अगदी गरजेवेळी वाहन उपलब्ध करण्याची सूचनाही केली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले. कायदा सुव्यवस्थेसाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही ते म्हणाले.  दिव्यांग मतदारांना सर्व सुविधा मिळणार दिव्यांग मतदार शोधणे, त्याची नावनोंदणी करणे, यादीत चिन्हांकित करण्याचे काम सुरू आहे. या मतदारांना निवडणूक आयोगाने सर्व सुविधा पुरविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार आवश्यक त्या सर्व सुविधांसह व्हीलचेअरची सुविधाही या निवडणुकीत दिली जाणार आहे. ४ हजार ३९९ दिव्यांग मतदारांचे नाव चिन्हांकित करण्यात आले आहे. सुविधा सॉफ्टवेअरद्वारे सर्व परवानग्या या निवडणुकीत उमेदवारांना सभा, मिरवणूक, प्रचार, बॅनर लावणे आदी विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी बराच वेळ लागत असल्याने यावेळी खास ‘सुविधा’ सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्याद्वारे सर्व परवानग्या दिल्या जाणार आहेत. अगदी मतमोजणीही या द्वारेच होईल. त्यामुळे उमेदवारांना तक्रारीला वाव राहणार नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे