पिंपळनेर येथे गाव गुढीसह नागरिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:59 AM2019-04-07T11:59:52+5:302019-04-07T12:01:53+5:30

गाव गुढी समिती : वीस वर्षापासून राबवित आहे उपक्रम; कार्यक्रमात वैकुंठ रथाचे लोकार्पण

Citizen felicitation with village gudhi at Pimpalner | पिंपळनेर येथे गाव गुढीसह नागरिकांचा सत्कार

dhule

Next

पिंपळनेर : येथील गुढीपाडवा समितीतर्फे शनिवारी शहरातील ४२ हिंदू मंदिरांवर नेव भगवे ध्वज वाजतगाजत लावण्यात आले. सकाळी ९.३० वाजता माळी गल्लीत विर सावरकर चौकात गावगुढी उभारण्यात आली. दरम्यान गावाला दुसऱ्या वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावात चांगले कार्य करणाऱ्या नागरिकांचाही सत्कार करण्यात आला.
पिंपळनेर शहरातील ४५ तरुणांनी २० वर्षापूर्वी गुढीपाडवा समिती स्थापन केली. स्वखर्चाने वर्गणी करुन व गावासाठी पहिला वैकुंठ रथ गावाला भेट दिला. गावातील कोणत्याही समाजाच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर स्वशानभूमीपर्यंत शव नेण्यासाठी हा वैकुंठ रथ मोफत दिला जातो. शनिवारी गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत शहरातील ४२ हिंदू मंदिरांवरील जुने ध्वज उतरवून नवे ध्वज वाजत गाजत लावण्यात आले. नंतर ९.३० वाजता माळी गल्लीतील चौकात गाव गुढी उभारण्यात आली.

Web Title: Citizen felicitation with village gudhi at Pimpalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे