२० पथकाद्वारे होणार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:14 PM2020-09-23T21:14:45+5:302020-09-23T21:15:21+5:30
माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम : पहिल्या टप्यात १० आॅक्टोंबरपर्यंत होणार तपासणी, नागरिकांनी सहकार्य करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : येथील नगरपालिकेने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे आरोग्य सर्व्हेक्षण अभियान राबविण्यासाठी २० आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे.पथक दररोज ५० घरांचे सर्व्हेक्षण करणार आहे.पंधरा दिवसात १४ हजार ५०० हजार कुटुंबियांच्या भेटी घेऊन आरोग्य सर्व्हेक्षण करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
े ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या अभियानाचे दोंडाईचा नगरपालिकेत १५ सप्टेंबरला औपचारिक उदघाटन झाले. या वेळी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम , उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण मोरे, भाजपशहर अध्यक्ष प्रवीण महाजन, आरोग्य सभापती मनीषा गिरासे यांचे सहाय्यक जितेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, संजय तावडे, भरतारी ठाकूर, आरोग्य विभागाचे शरद महाजन आदी उपस्थित होते.
आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले .सर्वेक्षण करणाऱ्यांना सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, थर्मल गन, आॅक्सिमिटर ,स्टेशनरी देण्यात आली आहे. आरोग्य सर्व्हेक्षण पथक प्रत्येकाचे तापमान थर्मल गनने मोजतील व आॅक्सिमिटरने प्राणवायूची मात्रा मोजतील. सर्वेक्षणात एखाद्या व्यक्तीचे तापमान १०० अंश पेक्षा जास्त व रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असेल अशा व्यक्तीची नोंद घेऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याचे सांगण्यात येईल.अभियानात ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास,घसा खवखणेआदी बाबी तपासल्या जातील .अवयव प्रत्यारपन,कर्करोग,मधुमेह, मूत्रपिंडाचे त्रास अशा व्यक्तीची पण माहिती घेतली जाणार आहे.पहिल्या १५ दिवसात संपूर्ण माहिती संकलित केली जाईल. तर त्या पुढील १० दिवस पुन्हा पाठपुरवठा करून दिलेल्या अँप मध्ये माहिती संकलित करतील.या अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
दरम्यान या मोहिमेमुळे घरोघरी नागरिकांची तपासणी होणार असल्याने, कोरोना संशयित रूग्णांची माहिती मिळू शकणार आहे.