धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे शहरात 'स्वच्छता ही सेवा' अभियान राबविण्यात येत आहे़ नियोजनासाठी मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालणात बैठक घेण्यात येणार आहे़राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचीत्यसाधून देशभरात ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानार्गत पांझरा नदी परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.नदी पात्रातील प्लास्टीक गोळा करण्यात येईल. मोहीमेत शहरातील नागरिक, मनपा अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, आशा सेविका, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी विद्यार्थी सहभागी होतील. मनपातर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात प्लास्टीक जमा करण्यासाठीचे केंद्र व सुका कचरा खरेदी केंद्र सुरु करण्यात येईल.या केंद्रावर नागरिकांनी घरातील प्लास्टीक जमा करुन त्या बदल्यात मोबदला देण्यात येईल. शहरातील सर्व कचरावेचक, भंगार व्यावसायिक यांची बैठक घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, सहा. आयुक्त शांताराम गोसावी, पल्लवी शिरसाठ, आरोग्याधिकारी मधुकर पवार यांनी केले आहे़
स्वच्छता अभियानातून नदीपात्राची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 10:34 PM