दुकानदार ओट्यांवर
धुळे : बाजारपेठेतील दुकाने दुपारनंतर बंद असल्याने दुकानांच्या मोकळ्या ओट्यांवर दुकानाचे मालक, कामगार किंवा इतर नागरिक केवळ टाईमपास म्हणून येऊन बसत आहेत. सुदैवाने मास्कचा वापर होत आहे.
सीटी स्कॅनची सुविधा
धुळे : कोरोना रुग्णांना किती इन्फेक्शन आहे हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. खासगी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅनचे दर जास्त आहेत. जिल्हा रुग्णालयात मात्र माफक दरात सुविधा आहे.
दुपारी शुकशुकाट
धुळे : मे हीटचा तडाखा आणि कोरोनाचे कठोर निर्बंध यांमुळे दुपारी शहरातील काही चौकांमध्ये अक्षरश: शुकशुकाट असतो. मात्र सायंकाळी याच चौकांमध्ये वर्दळ वाढलेली असते. दुकाने मात्र दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू असतात.
ज्येष्ठ नागरिक रांगेत
धुळे : कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीमुळे बँकांच्या कामाचा वेग देखील मंदावला आहे. निवृत्तीवेतन वा निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सावलीचा आसरा घेऊन रांगेत बसावे लागते.